महत्वाची माहिती : वरंधा घाट रस्ता बंद ! असा असेल पर्यायी मार्ग - टॉप न्यूज मराठी

पुणे : जुलै महिन्यामध्ये पावसाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. अशातच अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाडापाडी तर दरड प्रवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दरड पडत असल्याने प्रशासनें सत्ताकताचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय महामार्ग 965 डीडी राजेवाडी ते वरंधा, भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाट परिसरातील रस्त्यावर पावसाळयात अतिवृष्टीमुळे संभाव्य दरड कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून 31 ऑगस्ट पर्यंत वरंधा घाटरस्ता बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत. 

पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव-निजामपुर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरुर-सातारा-कराड-कोल्हापूर किेवा राजेवाडी पाटा-पोलादपुर-खेड-चिपळून पाटण-कराड-कोल्हापूर या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याबाबतचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.