RAIN UPDATES : पुणे आणि मुंबईमध्ये सध्या पावसानं धुवाधार कोसळून अक्षरशः री ओढली आहे. एक जुलैपासून सातत्याने पडणाऱ्या पावसानं जनजीवन आता मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. जीवितहानी देखील झाली असल्याकारणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घरात राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यामुळे मुंबईचा वेग आता मोठ्या प्रमाणावर मंदावला आहे.
मुंबई आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दरड कोसळणे, झाडपडी अशा नैसर्गिक आपत्ती असल्याकारणामुळे रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे रेल्वे मार्ग देखील बंद करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरही दरड कोसळली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गालाही पावसाच्या तडाख्याचा मोठा फटका बसल्यास दिसून येत आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाचे अधिक हाल होत आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. ज्यामुळे दरड कोसळणे, झाडपडी अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. मुंबईत इमारत पडून मलबा झोपडीवर पडल्याने कुटुंब मृत्युमुखी पडल्याची घटना देखील घडली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आज दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर वारं देखील वाहणार आहे. त्यामुळे झाडपडीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी घरातच बसावे असं आवाहन देखील सातत्याने करण्यात येत आहे.
रेल्वे वाहतुकीला देखील मोठ्या प्रमाणावर हा फटका बसला असून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 16 गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस आणि धुळे एक्सप्रेस या पाच गाड्यांचा समावेश आहे.
दरम्यान मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक अनियमित झाली आहे. नैसर्गिक आपत्तीकडे रेल्वे प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून पुढील माहिती लवकरच प्रसारित करण्यात येईल. तसेच वसई रोड विरार स्थानकादरम्यान मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा सध्या 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.