मोठी बातमी : मावळमध्ये घरावर दरड कोसळल्याने कुटुंब ढीगाऱ्याखाली अडकल्याची भीती; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल - टॉप न्यूज मराठी

मावळ : मावळ तालुक्यातील पाटण येथील गावांमध्ये एका घरावर दरड कोसळल्याने संपूर्ण कुटुंब या मलब्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जाते आहे. सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी पोहोचले असून मलबा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील पाटण गावामध्ये सहा जुलैला पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. दरम्यान या घटनेमध्ये एक कुटुंब घरामध्ये असताना दरड कोसळल्याने मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती दल पुणे पाचव्या बटालियनची मदत देखील मागवण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रवींद्र यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडर चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली 30 सदस्यांचे पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह घटनास्थळी रवाना झाले आहे. दरम्यान अद्याप पर्यंत बचाव कार्य सुरू असून कोणत्याही प्रकारच्या जीवित हानी बद्दल माहिती देण्यात आलेली नाही.