मुंबई : मोठी बातमी समोर येते आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच दरड कोसळणे, झाडपडी, इमारती कोसळणे, नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे वाहून जाणे अशा घटना होत आहेत. दरम्यान आज दुपारनंतर 30 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा गंभीर आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान रविवारी मुंबईमध्ये बेकायदेशीर इमारत कोसळल्याने शेजारी असलेल्या झोपडीवर ही इमारत कोसळली. ही इमारत बेकायदेशीर असून त्यामध्ये लोक राहत नव्हते. परंतु झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांचा मृत्यू झाला. अशातच मॅन हॉलमध्ये पडून वाहून जाणे अशा अनेक घटना समोर असताना हवामान खात्याने दिलेल्या माहितीला दुजोरा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, " मुंबईत दरवर्षी मानसूनमध्ये सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं कोसळली आहेत. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होमची विनंती करण्यात आली असून दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वार वाहणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली आहे. दरम्यान आज सोमवारी दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे झाडपडीच्या घटना पुन्हा होऊ शकतात. त्यामुळे प्रवास टाळावे, अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये. मुंबई पुणे महामार्ग बंद आहे. संपूर्ण महापालिका आपत्कालीन कक्ष पूर्णपणे रस्त्यावर उतरून या परिस्थितीचा सामना करत आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्याने यंत्रणा सज्ज झाली आहे. काही लोक या ठिकाणी अडकले आहेत. गाड्या बाहेर काढण्याचे काम सुरू असून झालेल्या घटना आणि त्यावर केलेली कार्यवाही तसेच तयारी आधीच केलेली आहे. अशी माहिती सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.