राज्याचे मत्स्यपालन व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली असून राणेविरोधात यांच्याविरोधात जामीन पत्र वॉरंट जारी करण्यात आलाय नेमकं हे प्रकरण काय आहे पाहुयात...
2013 मधील धारगळ-पेडणे टोलनाका तोडफोड आणि कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात गोव्यातील म्हापसा न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
शनिवारी झालेल्या सुनावणीवेळी इतर आरोपी न्यायालयात हजर असताना नितेश राणे गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही कारवाई केली.
आता त्यांना 6 जुलै रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.