पती पत्नीचे वाद सोडवायला गेले आणि... दोन वेगवेगळ्या घटनांनी मुर्तीजापुर तालुका हादरला - टॉप न्यूज मराठी

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तीजापूर तालुक्यातून आज दोन अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आल्या आहेत. 

कौटुंबिक वाद आणि नात्यांमधला कडवटपणा कोणत्या थराला जाऊ शकतो, याचं विदारक चित्र आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळालं. 

एका घटनेत दारूच्या नशेत पतीने स्वतःच्या पत्नीवर धारदार शस्त्राने थेट डोक्यात वार केले, 

तर दुसऱ्या घटनेत पती-पत्नीचा वाद मिटवायला गेलेल्या नातेवाईकांनाच बेदम मारहाण करण्यात आली. तालुक्यात सध्या या दोन्ही घटनांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

पहिली घटना घडलीये मूर्तीजापूर शहरात. इथे एका घरात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. 

पती दारूच्या नशेत होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, पतीने घरातलं धारदार शस्त्र काढलं आणि पत्नीच्या डोक्यात घातलं.

 या जीवघेण्या हल्ल्यात पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. सुदैवाने शेजाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केलं. 

सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत, पण प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या राधा आयुष पवार यांनी काय सांगितलंय पाहुयात...

मूर्तिजापूर तालुक्यातही दुसरी एक अशीच घटना घडली, जिथे पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करायला गेलेल्या नातेवाईकांनाच रक्तबंबाळ करण्यात आलं. बोदेगावचे हे नातेवाईक आहेत.

 एका दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा संसार पुन्हा व्यवस्थित सुरू व्हावा, या चांगल्या उद्देशाने मुलीकडचे नातेवाईक मुलाच्या घरी समेट घडवून आणण्यासाठी गेले होते. 

दोन्ही बाजूने चर्चा सुरू असतानाच, अचानक मुलाकडच्या लोकांचा पारा चढला. काही समजण्याच्या आतच त्यांनी लाठ्या-काठ्या काढल्या आणि मुलीकडच्या नातेवाईकांना बेदम चोप दिला. 

या हल्ल्यात मुलीची आई आणि तिचे मोठे वडील गंभीर जखमी झालेत