तुम्ही जर बाहेर पाणीपुरी खाण्याचे शौकीन असाल, तर ही बातमी तुमच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
नंदुरबार शहरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात विनापरवाना आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या एका पाणीपुरी निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली आहे.
या कारवाईत 77 हजार रुपयांचा संशयास्पद आणि भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करून कारखान्याला तात्काळ सील ठोकण्यात आलं आहे.
या कारवाईमुळे नंदुरबारमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
राज्यात नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विशेष मोहीम राबवली जात आहे.
याच मोहिमेअंतर्गत नंदुरबारमध्ये अन्न प्रशासनाने मोठी कारवाई केली.
मंगळवारी सायंकाळी सहाय्यक आयुक्त सपना गोडसे-पाटील आणि अन्नसुरक्षा अधिकारी तुषार देवरे यांच्या पथकाने बसस्थानक परिसरातील एका पाणीपुरी कारखान्यावर अचानक धाड टाकली.
राज्यात नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ मिळावेत,
यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विशेष मोहीम राबवली जात आहे.
याच मोहिमेअंतर्गत नंदुरबारमध्ये अन्न प्रशासनाने मोठी कारवाई केली. मंगळवारी सायंकाळी सहाय्यक आयुक्त सपना गोडसे-पाटील आणि अन्नसुरक्षा अधिकारी तुषार देवरे यांच्या पथकाने बसस्थानक परिसरातील एका पाणीपुरी कारखान्यावर अचानक धाड टाकली.