मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित "ब्राइट बिझनेस आयकॉन अवॉर्ड्स" या सोहळ्यात एनिटाईम बार्टर व्हेंचर्स या कंपनीला "आयकॉनिक सोल्यूशन प्रोव्हायडर" या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमोद ब्रम्हे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यात आला.
व्यापार क्षेत्रात नाविन्यपूर्ण सेवा आणि प्रभावी भागीदारी उपाययोजना पुरवल्याबद्दल कंपनीची निवड करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना ब्रम्हे यांनी हे यश ग्राहकांचा विश्वास, व्यावसायिक भागीदारांचे सहकार्य आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे फळ असल्याचे सांगितले. या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आणि भविष्यातही नवीन भागीदाऱ्या आणि यशाचे टप्पे गाठण्याचा मानस व्यक्त केला.
व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाच्या पुरस्कारामुळे एनिटाईम बार्टर व्हेंचर्सच्या कार्याला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे.