GOLD RATE : गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार नाही असे सोन्याचे भाव झाले होते. परंतु लग्नसराई पाहता अनेक जण इच्छुक असताना देखील सोने खरेदी करू शकत नव्हते. त्यात काही दिवसांपूर्वी युद्ध काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोने खरेदी करू नका असे आवाहन केले होते. त्यामुळे निराश झालेल्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. अनेक दिवसानंतर सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे.
सोन्याच्या भावांमध्ये आज तब्बल दीड हजार 1500 रुपयांची घसरण झाली आहे. 1 एक जुलै 2026 ला दहा ग्राम सोन्यासाठी 1 लाख 44 हजार 200 रुपये भाव सुरू आहे. तर चांदीच्या दरातही कमालीची घसरण झाली असून चांदीचे २ दोन हजार रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे चांदी आता 2 लाख 31 हजार 750 रुपये पर्यंत पोहोचली आहे.
सणासुदीच्या काळात देखील अनेक जण सोने खरेदीसाठी हात आखडता घेत होते पण आजचे भाव पाहता सोने किंवा चांदी खरेदीचा प्लॅन करत असतात तर ही बातमी दिलासादायक आहे.