पुणे : सध्या महाराष्ट्रातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण प्रचंड गाजते आहे. केतन अग्रवाल याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी केतनला कट रचून लोहगडाच्या कडावरून तीनशे फूट दरीमध्ये ढकलून दिले. माध्यमांमधून प्रसारित झाले तसं हे प्रकरण देशभरात गाजत आहे. विशेष म्हणजे लोहगडावर नेमकं केतनला सियाने आणि चेतनने कुठून ढकललं हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर थेट दिल्ली मधून देखील पर्यटक दाखल होत आहेत.
खरंतर केतन अग्रवाल या तरुणाचा हाकणाक बळी गेला आहे. या घटनेमध्ये केतन अग्रवाल, चेतन चौधरी आणि सिया गोयल अशा तीन कुटुंबांना मोठा धक्का बसला. अजूनही या प्रकरणांमध्ये मोठमोठे उलगडे होता आहेत. पण आता लोहगडावर पर्यटक हे पाहण्यासाठी येत आहेत की नेमकं सियाने केतनला कुठे ढकललं.
स्थानिक लोकांनी सांगितलं की सामान्यतः लोहगडावर जेवढे पर्यटक यायचे त्यात आता 50 टक्क्यांची भर पडली आहे. लोहगडावर पर्यटक एकीकडे तो स्पॉट पाहण्यासाठी येऊ लागले आहेत. तर सोशल मीडियावर देखील अनेक रील ट्रेंड होत आहेत.