मुंबई : सध्या महाराष्ट्रमध्ये राजकीय भूकंप सुरू आहेत आज सचिन अहिर नावाचा मोठा भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात आज झाला. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या किल्ल्याला मोठं खिंडार पडले. पण आता गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल आहे.
एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी पाठ फिरवून एकनाथ शिंदे यांची साथ निवडली. त्यानंतर आता आमदारांना देखील गळती लागायला सुरुवात झाली आहे. आज सचिन आहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या काही वक्तव्यानंतर आधीच राजकीय भूकंप सुरू असलेल्या महाराष्ट्रात चर्चेला नेमके कोणते आमदार अजून फुटणार असा नवीन प्रश्न उपस्थित झालाय.
मंत्री गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, " आम्ही जे भाकीत करत होतो ते आता खरं ठरताना दिसून येते. फक्त भाषणे देऊन राजकारण होत नाही. तर जनतेपर्यंत रेशन आणि विकासाची कामेही पोहोचवावी लागतात. तळागाळात जाऊन लोकांमध्ये काम केल्याशिवाय जनतेचा विश्वास मिळत नाही. शिंदे साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करून काही साध्य होणार नाही. आपल्या वक्तव्यांवर संयम ठेवायला हवा. लोक सर्व पाहत आहेत असा थेट सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
दरम्यान पत्रकारांनी सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावर प्रश्न विचारले असता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "काही गोष्टींची गोपनीयता राखावी लागते. मात्र इतके नक्की सांगतो की तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात आहे." असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
एकंदरीतच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आता नेमके कोणते आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे येणारा काळच स्पष्ट करेन.