मुंबई : उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठ्या धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. सहा खासदार फुटल्यानंतर खरंतर आमदार देखील असल्याची चर्चा सुरू होती. अशातच आता उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सचिन आहेर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून आज विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज दाखल केलाय.
आज पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सचिन आहेर हे वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकट आहेत. अरुण गवळी यांचे भाचे अशी ओळख असलेले सचिन आहेर यांनी मील युनियनच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार यांच्या हाताखाली ते तयार झाले. दरम्यान ठाकरे यांनी विधान परिषदेवर त्यांना पाठवलं होतं. विधानसभेत वरळी मतदारसंघाच सचिन आहेर यांनी प्रतिनिधित्व केलं. दरम्यान आज त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.
सचिन आहेर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज दाखल केला असून यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सु नेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या.