राशिभविष्य : येत्या जुलै महिन्यामध्ये सूर्य, शनी आणि बुध हे ग्रह भ्रमण करणार आहेत. मोठ्या ग्रहांच्या या भ्रमणामुळे काही राशींचे नशीब पालटणार आहे. यामध्ये महत्त्वाच्या या तीन राशी आहेत ज्यांच्या आर्थिक चणचण आता संपणार असून तुमच्या प्रेम संबंधांमध्ये देखील आता चांगला बदल दिसून येईल.
सिंह रास गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या त्रासातून दिवस काढते आहे. आर्थिक मानसिक त्रास प्रचंड प्रमाणात सुरू आहेत. कौटुंबिक समस्यांनी गुंतलेल्या सिंह राशीला आता कुठेतरी दिलासा मिळायला सुरुवात होऊ शकते. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला बढती मिळण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला चांगल्या संधी चालून येतील. त्यामुळे आर्थिक चणचण आता कमी जाणवू लागेल. प्रेम संबंधांमध्ये जिभेवर नियंत्रण ठेवल्यास गोडवा वाढेल.
धनु राशीसाठी येणारा काळ आता स्थैर्य घेऊन येत आहे. शनीची ढेंया सहन केलेल्या धनु राशीला देखील आता मोठा दिलासा मिळू शकतो. ज्यांना नोकरी नाही अशांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील. विवाह इच्छुकांचे विवाह ठरणार आहेत. अनेक दिवसांपासून आरोग्याच्या जर काही तक्रारी असतील तर त्या देखील आता कमी होऊ लागतील.
वृषभ राशीच्या जीवनात आता सूर्याची स्थिती चांगली असल्याकारणाने आर्थिक मोठे फायदे होण्याची दाट शक्यता आहे. जर अनेक दिवसांपासून तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर प्रेम प्रकरणात तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी जिभेवर गोडवा ठेवा.