अमरनाथ यात्रा : काही सेकंदाच्या दर्शनासाठी अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या अमरनाथ यात्रेला दरवर्षी अनेक श्रद्धाळू हजेरी लावत असतात. शिवभक्तांसाठी आता याच अमरनाथ यात्रेसाठी महत्त्वाची माहिती आहे. अमरनाथ यात्रा यावर्षी 3 जुलै 2026 ला सुरू होते आहे. त्यामुळे तुम्ही जर अमरनाथ यात्रेला येण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
अमरनाथ यात्रा बाबत अनेक पौराणिक कथा आहेत. परंतु भारतभर असलेल्या शिवलिंगांमध्ये अमरनाथमधील बर्फा पासून बनलेल्या या शिवलिंगाला देखील मोठे महत्त्व आहे. हे शिवलिंग गुहेच्या वरच्या भागातून ठिबकणाऱ्या पाण्याच्या थेंबा पासून तयार झाले आहे. ते शिवलिंग बर्फापासून तयार झाले असल्याकारणाने बाबा बर्फानी असे देखील म्हटले जाते.
अमरनाथ यात्रा करत असताना तुम्हाला अत्यंत थंड परिसरातून मोठे अंतर चालत काढायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच बरोबर सोबत आधार कार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र ज्यावर तुमचा फोटो स्पष्ट दिसेल असे आवश्यक आहे.
या यात्रेला सुरुवात करतेवेळी तुमच्याजवळ पाण्याची बाटली, शरीराला ताकद देईल असे ग्लुकोज बार, मोबाईल टॉर्च अशी काही साधने आवश्यक ठेवा. सोबत आवश्यक अशी औषधे देखील ठेवा.
उंच ठिकाण असल्याकारणाने या ठिकाणी श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या जाणवू शकते. त्यामुळे अशी कोणतीही समस्या जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.