एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निंबाळकरांच्या एंट्रीने धाराशिवमध्ये युतीत जुंपली? राणाजगजीत सिंह पाटील यांच्या मुलाचे भावी खासदार म्हणून झळकले बॅनर - टॉप न्यूज मराठी

धाराशिव : सध्या महाराष्ट्राचा राजकारण कापलेला आहे. रोजच काहीतरी नवीन हालचाली पाहायला मिळत आहेत. सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आउटगोइंग सुरू असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग सुरू आहे. एकीकडे सहा खासदार युतीकडे आल्यामुळे ताकद वाढली असली तरी युतीतील अंतर्गत धुसफूस वाढायला देखील सुरुवात झाली आहे. धाराशिवमध्ये असंच काहीसं वातावरण पाहायला मिळते आहे.

 राणाजगजीत सिंह पाटील यांच्या मुलाचे भावी खासदार म्हणून झळकले बॅनर 

धाराशिवमध्ये राणा जगजीत सिंह पाटील यांचा मुलगा मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवमध्ये मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. परंतु हे बॅनर केवळ वाढदिवसानिमित्त नसून कुठेतरी युतीतील धुसफुस दाखवून देणारे आहेत अशी चर्चा रंगली आहे. मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या या बॅनरवर भावी खासदार असे लिहिले आहे. त्याचबरोबर हॅशटॅग एमपी 20२9 असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. त्यामुळे आता येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मल्हार पाटील मैदानात उतरण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सहा खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील एकनाथ शिंदे सोबत हात मिळवणी केली आहे. त्यामुळे निंबाळकरांच्या महायुतीतील प्रवेशामुळे धाराशिवमधील पारंपारिक पाटील निंबाळकर लढत आता अधिक आक्रमक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे. निंबाळकरांच्या युतीतील या इनकमिंगमुळे धाराशिवच्या राजकारणात आता नवीन अध्यायाला सुरुवात होणार असल्यामुळे यापुढे आता धाराशिवकर कोणाला निवडतात हे येणारा काळच ठरवेल.