सासवड येथील सम्राट अशोक फलकावरून वादातील गुन्ह्यातील आरोपी प्रशांत साबळे यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर - टॉप न्यूज मराठी

सासवड येथील सम्राट अशोक फलकावरून वादातील गुन्ह्यातील आरोपी प्रशांत साबळे यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

सासवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 159/2026 मधील आरोपी प्रशांत साबळे यांना पुणे येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी सासवड येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 352(3) आणि 3(5) अंतर्गत नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद दोन गटांमध्ये झालेल्या भांडणातून उद्भवला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता.

JMFC न्यायालयाकडून जामीन अर्ज नामंजूर झाल्यानंतर आरोपी प्रशांत साबळे यांनी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी मा. सत्र न्यायाधीश श्रीमती टाकळीकर यांच्या न्यायालयात झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला.

आरोपीच्या वतीने अॅड. अथर्व देशपांडे, अॅड. रोहित पवार आणि अॅड. हर्षवर्धन हरपुडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. युक्तिवादाच्या तयारीसाठी जयेंद्र निकम यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले. बचाव पक्षाने प्रकरणातील तथ्ये, आरोपीची भूमिका, घटनेची पार्श्वभूमी तसेच तपासाच्या अनुषंगाने आवश्यक बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सासवड पोलीस ठाण्याकडून सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे.