सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी खोल विहिरीत खाट टाकून आंदोलन;जालन्यातील अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल - टॉप न्यूज मराठी

राज्यातील शेतकऱ्यांचा संताप आता थेट विहिरीपर्यंत पोहोचला आहे. 

जालन्यातील भोकरदनमध्ये कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दोन शेतकऱ्यांनी चक्क विहिरीत खाट टाकून अनोखं आंदोलन केलंय. 

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून आंदोलनाचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे.

 राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणाविरोधात शेतकरीपुत्र विकास जाधव आणि नारायण लोखंडे यांनी चक्क एका खोल विहिरीमध्ये खाटेवर बसून अनोखं आंदोलन सुरू केलं

. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि कर्जमाफीसाठी लावण्यात आलेले जाचक निकष रद्द करण्यात यावेत, अशी या आंदोलक शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. 

खोल विहिरीत खाटेवर बसलेल्या या शेतकऱ्यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.