'डॉन ३' वाद: अभिनेता ॲमी वर्कचा रणवीर सिंहला जाहीर पाठिंबा; निर्मात्यांवर साधला निशाणा - टॉप न्यूज मराठी

 फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन ३’ चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यामुळे अभिनेता रणवीर सिंह सध्या वादात सापडला आहे. याप्रकरणी 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज'ने (FWICE) रणवीरविरोधात 'असहकार निर्देश' (Non-Cooperation Directive) जारी केले होते. मात्र, सिनेसृष्टीतून झालेला विरोध आणि रणवीरने पाठवलेली कायदेशीर नोटीस यानंतर हे निर्देश मागे घेण्यात आले. या संपूर्ण वादात आता अभिनेता आणि गायक ॲमी वर्कने रणवीर सिंहची बाजू घेत एक्सेल एंटरटेन्मेंटच्या निर्मात्यांवर (फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी) तीव्र शब्दांत टीका केली आहे. 

रणवीरवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत 'कनेक्ट सिने'ला दिलेल्या मुलाखतीत ॲमी वर्क म्हणाला, रणवीरचा काळ खराब असताना आणि त्याचे चित्रपट फ्लॉप होत असताना निर्माते गप्प होते. त्यांनी तेव्हा 'डॉन ३' चे शूटिंग सुरू केले नाही.  आता रणवीरचा 'धुरंधर' चित्रपट हिट होऊन तो पुन्हा फॉर्मात आल्यावर निर्माते पैशांची मागणी करत आवाज उठवत आहेत. निर्मात्यांचे जे काही २-४ कोटी रुपये असतील ते त्यांनी घ्यावेत आणि वाद संपवावा. ४५ कोटी रुपयांची एवढी मोठी रक्कम कोण देणार? '८३' चित्रपटात रणवीरसोबत काम करणाऱ्या ॲमीने सांगितले की, या वादात रणवीरची कोणतीही चूक नाही आणि त्याचा रणवीरवर पूर्ण विश्वास आहे. निर्माते हवी तर कोर्टात केस करू शकतात, पण अशा केसेस २०-२० वर्षे रेंगाळतात आणि त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.

#topnewsmarathi #topnewsmarathipune #topnewsmaharashtra #Marathibreakingnews #marathinews #marathinewslive #superfast #topnewsmarathi #marathitopnewsnews #liveblog #liveupdate #todaybreakingnews #ताज्या_बातम्या #लेटेस्ट_व्हिडिओ #topstory #मराठी_बातम्या #latestmarathinews