भाविकांची बोट पलटल्याने भीतीचं वातावरण; लहान मुलांचाही समावेश - टॉप न्यूज मराठी

अधिक मासनिमित्त माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी असून या परसवाभूमीवर धक्कादायक घटना घडली. एक बोट पाण्यात पलटी झाली. त्यावेळी 50 भाविक बोटीत होते. 

अधिक मासनिमित्त माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. यादरम्यान बोटणे प्रवास करतात. बोटमद्धे 40 ते 50 भाविक प्रवास करत होते याच वेळी एक धक्कादायक घटना घडली, ही बोट अचानक पलटी झाली. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र एक लहान मुलगा बुडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने खळबळ उडाली. स्थानिक पोलिस प्रशासन आणि इतर यंत्रणेकडून शोध कार्य सुरू आहे. 

बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरीमध्ये भाविकांच्या सुरक्षेबाबत एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भगवान पुरुषोत्तम यांना समर्पित असलेल्या देशातील एकमेव मंदिरात अधिक मास यंत्रदरम्यान, गोदावरी नदीच्या काठावर भाविकांना घेऊन जाणारी ही बोट पलटली. बोटीत अंदाजे 50 भाविक होते. जास्ती भारमुळे हा अपघात झाला. या अपघातात मोठी प्राणहानी टळली असली तरी, 10 ते 12 वर्षे वयोगटातील एक मुलगा बेपत्ता आहे. बोटीतील महिलांनी सांगितले की, बोट उलटल्यानंतर त्या नदीच्या खोल पाण्यात बुडाल्या आणि त्यानंतरच त्या बचावल्या. अधिक मास यात्रेमुळे पुरुषोत्तमपुरी येथे लाखों भाविक येतात. बोट चलकांवर नियमाचे उल्लंघन आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्याचे आरोप होत आहेत. लाखों रुपयांचे करार देण्यात आले आहेत, पण सुरक्षेचे उपाय कुठे आहेत. लाइफ जॅकेट नाही, पुरेसे निरक्षणही नाही. 

यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. यात्रेकरूंच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? सध्या, भाविक आणि स्थानिकांनी प्रशासनाकडून तात्काळ हस्तक्षेप, दोषींवर कारवाई आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे. 

#topnewsmarathi #topnews #breakingnews