धमक्यांचं सत्र सुरूच; पुण्यानंतर मुंबईच्या महापौरांना टार्गेट - टॉप न्यूज मराठी

मुंबईच्या महापौरांना गाडी आणि केबिन बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली.  मुख्यालयातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. 

 पुणे महापालिकेपाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेतही धमकीचा मेल आल्याने राजकीय आणि पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एक अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची आणि त्यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या अज्ञाताने थेट ई-मेल पाठवून ही महापौरांची अधिकृत गाडी आणि महापालिका मुख्यालयातील त्यांचे केबिन बॉम्बने उडवून देऊ असा उल्लेख केला आहे. 

महितीनुसार, हा धमकीचा ई-मेल मिळताच महापालिका प्रशासनाने तातडीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह सायबर सेलणे या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. ज्या आयपी अॅड्रेसवरुण (IP Address) हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे, त्याचा तांत्रिक शोध घेतला जात आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची सखोल तपासणी केली जात आहे. 

मुंबईपूर्वी पुणे महानगरपालिकेतही अशाच प्रकारचा धमकीचा मेल आला होता. पुणे महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तसेच दोन बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून महापौर कार्यालयाची कसून तपासणी केली होती. सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या मुख्य इमारतीबाहेर काढण्यात आले होते. तब्बल दीड तासांच्या कसून तपासणीनंतर काहीही संशयादस्पद न आढल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा पालिकेत कामकाज सुरू केले. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतही पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. 

#topnewsmarathi #topnews #breakingnews #pmc #bmc