भरधाव सिमेंट मिक्सर पलटी: पुण्यातील नवले पूल पुन्हा एकदा चर्चेत - टॉप न्यूज मराठी

पुण्याच्या नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. भरधाव सीमेंट मिक्सर दुचकीवर पलटी झाल्याने 31 वर्षीय रामेश्वर भोगले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू. 

पुण्यातील सातत्याने आपघातांचे केंद्र ठरणाऱ्या नवले पूल परिसरात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला. बुधवारी (9 जून 2026) मध्यरात्री हा अपघात झाला, एक भरधाव सीमेंट मिक्सर पलटी होऊन थेट दुचाकीवर आदळल्याने मोठा आपघात झाला. या अपघातात एक 31 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की, दुचाकीस्वाराल पाळण्याची किंवा बाचावची कोणतीही संधी मिळाली नाही. रामेश्वर मच्छिंद्र भोगले (31) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. 

नऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 जून रोजी रात्री 12.30 च्या सुमारास नवले ब्रिजजवळील पल्स हॉस्पिटल समोर घडली. गोरख लक्ष्मण रानसुरे (50) हा चालक ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा सीमेंट मिक्सर घेऊन कात्रजकडून बावधानच्या दिशेने जात होता. नवले चौक परिसरात आल्यावर एक तीव्र वळणावर चलकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन वेगात असल्याने हा अवजड मिक्सर थेट रस्त्यावर पलटी झाला. दुर्दैवाने, त्याच वेळी रामेश्वर भोगले देखील बावधानच्या दिशेने आपल्या होंडा शाईन दुचकीवर येत होते. मिक्सरखाली रामेश्वर भोगले पूर्णपणे दबले गेले. जड वाहणाखाली चिरडले गेल्याने रामेश्वर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नऱ्हे पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली. अपघातानंतर कात्रज-देहूरोड बयपासवर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. 

अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त सीमेंट मिक्सर आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या अपघातात मिक्सर चालक गोरख रानसुरे याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निष्काळजीपणे, मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आणि भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला जाणार आहे. नऱ्हे पोलीस ठाण्यात ही प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नऱ्हे पोलीस करत आहेत.

#topnewsmarathi #topnews #breakingnews #navalebridge #punenews