युट्यूबवर ट्रेंड होतंय ‘हिल पोरी हिला’ गाणं .. गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल - टॉप न्यूज मराठी

दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या चित्रपटातील अजरामर गाण्याचा हा नवा आधुनिक अवतार ‘हिल पोरी हिला’ खरोखरच भारतात यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम आणि लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील यांची ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून गाण्याने थेट यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये 24 वे स्थान पटकावले आहे.  

तब्बल 52 वर्षांनंतर आलेल्या या गाण्याच्या रिमेकची वैशिष्ट्ये म्हणजे हे गाणे लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले असून, संगीत प्रसाद शिरसाठ यांनी दिले आहे.  

गाण्यात गौतमी पारंपरिक लाल नऊवारी साडीत तर भाऊ कदम थेट दादा कोंडके यांच्या लूकमध्ये दिसत आहेत. याशिवाय दोघांचे कोळी, रेट्रो आणि वेस्टर्न लूक्सही चर्चेत आहेत.  संपूर्ण गाण्याचे शूटिंग कोकणातील निसर्गरम्य आणि हिरव्यागार परिसरात, समुद्रकिनाऱ्यांवर करण्यात आले आहे. दादा कोंडके यांच्या गाण्यांमधील जो विनोद आणि हावभाव असायचे, त्याला भाऊ कदम यांनी स्वतःच्या विनोदी शैलीची जोड देऊन एक वेगळीच उंची दिली आहे. 'अंजनीच्या सुता' किंवा 'गंगू तारुण्य तुझं बेफाम' सारख्या गाण्यांप्रमाणेच याही गाण्याचे मूळ ट्यून इतके लोकप्रिय आहे की, रिमेक होताच ते लगेच लोकांच्या ओठांवर बसले.

#topnewsmarathi #topnewsmarathipune #topnewsmaharashtra #Marathibreakingnews #marathinews #marathinewslive #superfast #topnewsmarathi #marathitopnewsnews #liveblog #liveupdate #todaybreakingnews #ताज्या_बातम्या #लेटेस्ट_व्हिडिओ #topstory #मराठी_बातम्या #latestmarathinews