ना भुजबळ, ना नवनीत राणा; राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' ज्येष्ठ नेत्याला संधी - टॉप न्यूज मराठी

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेक इच्छुकांनी राज्यसभेवर जाण्याची तयारी दर्शवली होती. 

यामध्ये प्रामुख्याने छगन भुजबळ हे राज्यसभेचे प्रबळ दावेदार मानले जात होते सोबतच नवनीत राणा, सुबोध मोहिते यांच्या नावाची चर्चा ह राज्यसभेसाठी होत होती. 

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईत पार पडलेल्या बैठकीत चर्चेतील नावांना छेद देत धक्का तंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. 

कोण आहेत राजेंद्र जैन 

राजेंद्र जैन हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आहेत. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले असून, ते विदर्भातील एक प्रमुख नेते आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.