विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणुकीत पैशाचा वापर आणि धमक्या दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. मतं नव्हती म्हणून विरोधकांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार नाही झाली. आम्ही त्यांच स्वागतच करतो, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. तर या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडला. आमच्या उमेदवारांना आमिष दाखवलं, जे ऐकत नव्हते त्यांना धमक्या दिल्या. त्यामुळेच उमेदवारांनी माघार घेतल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी तर घोडेबाजारावरून भाजपला चांगलंच घेरलं आहे. मला तोंड उघडायला लावू नाक. मी पुरावे देईन, असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी महाविकस आघाडी माघार आघाडी झाल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. त्याबाबत तुमचं मत काय आहे? असं सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपला इशाराच दिला. भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. मे सुसंस्कृतपणे काही बोलत नाही. तो माझ्या स्वभाव नाही विधानसभा आणि लोकसभेत आम्ही त्यांच्या विरोधात ताकदीने लढूच. पण आता हा जो घोडेबाजार झाला. कोण काय आणि कसं झालं? हे तुम्हाला ही माहीत आहे, मलाही माहीत आहे. असा सूचक इशारा सुप्रिया सुळे यांनी दिल आहे.
#topsnewsmarathi #topnews #breakinnews #election2026