आज नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी जंतर-मंतर मैदानात आंदोलन करणार आहे. अभिजीत दिपके हे दिल्लीत दाखल झाले असून काहीच वेळात आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीत आंदोलन असून देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अभिजीत दिपके भारतात आलेले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी येथे केली जात आहे. अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घराजवळ पोलिस बंदोबस्त कायम आहे. अभिजीत दिपके यांना व्हॉटसअपवर धमकीचा मेसेज आल्यापासून आई वडीलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज दिल्ली मध्ये जंतर मंतर इथे आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे आज दिल्ली विमानतळावर पोलिसांचा मोठा बनबोडस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनामध्ये शांततेने सहभागी व्हा असं आव्हान दिपके यांनी तरुणांना केलं आहे. NEET, CUET इत्यादि राष्ट्रीय परीक्षांमधील कथित गैरवयव्हरांमुळे ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. संस्थापक अभिजीत दिपके हे दिल्लीत दाखल झाले असून थोड्यात वेळात आंदोलनाला सुरुवात होण्याची माहिती समोर येते.
अभिजीत दिपके दिल्ली विमानतळावर दाखल झाले असून त्यांनी अजून कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीये. परंतु विमानतळातून बाहेर येताना त्यांनी भारताच्या संविधानाचं पुस्तक लोकांना दाखवलं आहे. भारातच संविधान ते पुस्तक ज्या आधारित आपला भारात देश चालतो आणि जोडलेला आहे. हातात भारताच्या संविधानचं पुस्तक घेऊन ते विमानताळतून बाहेर पडताना दिसले आहेत. CJP चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्राम वर 2 कोटीपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. त्या तुलनेत आजच्या प्रदर्शनात किती लोकं आंदोलनात सहभागी होतात याची उत्सुकता आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #trending #cjp #abhijeetdipke