स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना माघार घेण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांने केले.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उलटून गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर काही गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मध्यमांशी संवाद साधतान राऊत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि जागा बिनविरोध करण्यासाठी तब्बल 150 कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप केला.
राउत म्हणले की, पुणे, छत्रपती संभाजी नगर, आणि कोकणसह अनेक जागी उमेदवारांच्या माघारीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करण्यात आले. “दिवसभरात सुमारे 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले. काही ठिकाणी उमेदवारांना माघार घेण्यासाठी मोठ्या रकमा देण्यात आल्या. कोकणातील एक माघारीसाठी तब्बल 25 कोटी रुपये दिल्याची माहिती आमच्याकडे आहे. त्यातील 15 कोटी रुपये मुंबईतील बिकेसी परिसरातील एक हॉटेलमध्ये देण्यात आले. असा आरोप राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत विचारले की, “तुमच्याकडे आधीच स्पष्ट बहुमत आणि संख्याबळ असताना घोडेबाजार करण्याची गरज काय?” तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी खर्चात काटकसर करायचं सल्ला देतात. मग निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्यास परवानगी आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितह केला.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिति बघता त्यावर टीका करत, “हे प्रकार केवळ लोकशाहीसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रतिमा, संस्कृति आणि राजकीय परांपरेलाही कालिमा फसणारे आहे,” असे मत व्यक्त केले. राऊत यांच्या आरोपांमुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तपण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #vidhansabhaelection #maharashtrapolitics