दिल्लीत आगेची मालिका सुरूच: बहुमजली इमारतीत भीषण आग, संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण. - टॉप न्यूज मराठी

दिल्ली सध्या सतत आगीच्या घटनांमुळे चर्चेत आहे. मालवीय नगरमधील घटनेला दोन दिवसही झाले नसताना आता एक इमारतीच्या एक फ्लॅटला ही आग लागली आहे. 

दिल्लीमधून एका मागून एक आगीच्या घटना घडत आहेत. मालवीय नगरमधील आगेची घटना ताजी असतानाचं पुन्हा एकदा अशीच काहीशी घटना समोर येत आहे. नोएडामध्ये एक बहुमजली इमारतीला आग लागली आहे. मालवीय नगरमध्ये हॉटेलला लागलेल्या आगेत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पूर्णपणे निस्तारली नाही तोवरच आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 7.20 ला ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घतनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे सहा वाहने घटनास्थळी दाखल झाली. 12 व्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगितलं जात आहे. आगेचा भडका हा 12 व्या मजल्यावर झाल्यामुळे अग्निशमन दलाला थोडे अडथळे येत आहेत. 

आगीचे मोठे धूर फ्लॅटमधून बाहेर येताना दिसले. आगीचा भडका उडला, काळा धूर आणि आगच सर्वत्र दिसत आहे. इमारतीतील रहिवाशांना सुखरूपपणे सुरक्षितस्थळी हलवले. जोरदार हवे मुळे आग अधिक पासरताना दिसली. इमारतीतील दोन फ्लॅटला आग लागल्याची समजून आले. ह्या फ्लॅटमध्ये नक्की किती लोक आहेत, याबाबत माहिती मिळत नाहीये. बाजूच्या फ्लॅटमध्ये पीजी असल्याचीही माहिती पुढे येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच इमारतीतील लोकांनी रिकाम्या जागेत धाव घेतली. 

ही आग नक्की काशी लागली, याची काही माहिती अजून समोर आली नाहीये. मात्र, आग ज्यापद्धतीने भडकली त्यानुसार स्पष्ट होतं आहे की पूर्ण फ्लॅट जळून खाक झाला आहे. सतत आगेची घटना सुरूच आहे. अग्निशमन दलासोबतच पोलिसही मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते.   

#topnewsmarathi #breakingnews #topnews #noidafireincident