नवरात्रीत काय जाहीर करणार पंकजा मुंडे? गोपीनाथ गडावरून दिले मोठे संकेत - टॉप न्यूज मराठी

गोपीनाथ मुंडेच्या स्मृतिदिनी पंकजा मुंडेंनी मोठी घोषणा केली. नवरात्रीत ‘नवा संकल्प. जाहीर करणार. भारुड गाताना झाल्या भावूक.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे. या निमित्ताने गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भजन आणि कीर्तन ही ठेवण्यात आलं आहे. यावेळी पंकजा मुंडे या भारुड गाताना भावुक झाल्या. गोपीनाथ गडावर आलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी त्यानंतर संवाद साधला. येत्या नवरात्रीत मी मोठा संकल्प करणार आहे. हा तुटलेल्या कड्या जोडणारा आहे, राजकारण करणार नाही, अशी घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नवरात्रीत काय घोषणा करणार याकडे सर्वांच लक्ष वेढल आहे.

पंकजा मुंडे यांनी या वेळी काही संकल्प करण्याचे आव्हान केलं आहे. ‘एक पेड बाप के नाम’ असा माझ्या आजचा संकल्प आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांना मी आज रोप देणार आहे. मुंडे साहेबांची मान स्वर्गात उंचावली पाहिजे, असं मुंडे साहेबांचा प्रत्येक मावळा लढला पाहिजे, आपण फक्त नीट बोलणारे नाही, साखर घालणारे माणसं आहोत. दोन घास कमी खा आपण स्वाभिमानी रहा, हा एक संकल्प आहे. माझा आणखी एक संकल्प आहे तो मी नावरात्री मध्ये जाहीर करणार आहे. तो संकल्प सगळ्या तुटलेल्या कड्या जोडण्यासाठी असेल, राजकीय पोळ्या भाजण्यासाठी नाही. तो नवरात्रीत मी तुम्हाला सांगेल, असं पंकजा मुंडे म्हणल्या. गोपीनाथ गडावर अमित शाह येऊन गेले आहेत. या गडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यायचे राहिले आहेत. त्यांनी एकदा तरी या गडावर यावं ही माझी इच्छा आहे. अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. 

आज सर्वांसाठीच वेदना आणि दुःखाचा दिवस आहे. मे सगळ्यांचे आभार व्यक्त करते, इतक्या गरमीत तुम्ही इथे आला आहात. तुम्ही 12 वर्षांपासून इथे येत आहात. मी   स्वतः ट्रॅक्टर चालवणार आहे, 12 डिसेंबरला सकाळी 5 वाजता उठून इथल्या कार्यक्रमाआधी ऊसतोड कामगारानसोबत ऊस तोडणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. आज पर्यावरणाची अवघड परिस्थिति आहे आणि ते खातं माझ्याकडे आहे. तुमच्या घरात वाढदिवस असेल, दुःख झाले असेल, तुम्ही एक झाड लावा. शेतकर्यावर अन्याय झाल्यावर मुंडे साहेब लढत होते. कर्जमाफी मुंडे साहेबांनी दिली. रासायनिक नसलेली शेती आता मी करणार, असंही त्या म्हणल्या. 

दरम्यान, पंकजा मुंडे आज भावनिक झालेल्या दिसल्या. पंकजा मुंडे भजनात रमल्या होत्या. हातात विना घेऊन त्या भजनात रमून गेल्या होत्या. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्यावरील भारुड गाताना पंकजा मुंडे भावूक झाल्याचं दिसलं.  

#topnewsmarathi #breakingnews #topnews #maharashtra #politics