रणवीर सिंहवर इंडस्ट्रीत बॅन: कंगना राणौतने दिला रणवीरल सल्ला. - टॉप न्यूज मराठी

‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने FWICE ने रणवीर सिंहविरोधात असहकाराचे आदेश दिले. यावर अभिनेत्री कंगना राणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यापासून अभिनेता रणवीर सिंह सातत्याने चर्चेत आहे. शूटिंगच्या दिवस आधी अचानक या चित्रपटातून माघार घेणं रणवीरल चांगलंच महागात पडलं आहे. फरहानने केलेल्या तक्रारीनंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने (FWICE) राणवीरविरोधात असहकरचे आदेश जारी केले. म्हणजेच इंडस्ट्रीतल्या लोकांना रणवीरसोबत कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करण्यापासून रोखण्यात आलं आहे. या प्रकरणी विविध सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी रणवीरची बाजू घेतली आहे. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनीसुद्धा या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. 

कंगना सध्या त्यांच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशननिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांना रणवीरविरोधातील फेडरेशनच्या या आदेशबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कंगना म्हणल्या ‘जर तुम्ही मला विचारत असाल, तर माझ्यावर सगळ्यांनीच बंदी घातली आहे असं त्यांने हसून प्रतिक्रिया दिली. मी यावर इतकंच म्हणेन की जेव्हा तुमची प्रतिष्ठा वाढते तेव्हा तुमचे शत्रू देखील वाढतात. असं होऊच शकत नाही की तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे शत्रू नसतील. पण त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नये. तर आज रणवीर सिंहने विचार केला पाहिजे की त्याची प्रतिष्ठा किती वाढली आहे असं कंगना म्हणाल्या.’

“माझ्यावर संपूर्ण इंडस्ट्रीने बंदी घातली होती. पण मी हार मानली नाही आणि आता मी ज्याठिकाणी आहे, तिथे खूप खुश आहे. त्याचप्रकारे रणवीरनेही याबद्दल फार विचार करू नये, आपल्या वाटेत काही ना काही अडचणी येतच राहतात हे आयुष असंच असतं आणि यात चढउतार येतात. तुम्ही फक्त पुढे जाण्यावर लक्ष केंद्रीत करायचं असतं,” असा सल्ला त्यांनी रणवीरल दिला. 

फेडेरेशनच्या आदेशानंतर रणवीरच्या प्रवकत्याने या संपूर्ण प्रकरणी त्याची बाजू मांडत स्पष्ट केलं,”या चित्रपटसृष्टीचा आणि डॉन फ्रँचाइजीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा रणवीर खूप आदर करतो. या प्रकरणी त्याने जाणूनबुजून मौन बाळगलं होतं, कारण त्याच्या मते व्यावसायिक संवाद आणि वैयक्तिक नात्यांना प्रतिष्ठा, परिपक्वता आणि एकमेकांच्या सन्मानानेच संभाळलं पाहिजे. वेळोवेळी त्याबद्दल विविध चर्चा झाल्या. पण रणवीरने कधीच सार्वजनिकरित्या उत्तर देण्याला अधिक हवा देणं गरजेचं मानलं नाही. 

#topnewsmarathi #topnews #trending #bollywood #celebritygossip