नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. इंधन, LPG सिलिंदरच्या वाढलेले दर आणि महागाईविरोधात हे आंदोलन केलं.
मुंबई मध्ये विविध प्रश्नांवरून आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केला आहे. वाढत्या दरांवरून हे आंदोलन सुरू आहे. इंधन, LPG सिलिंडर आणि महागाई विरुद्ध हे आंदोलन करण्यात येतयं. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चुल मांडली आणि चपट्या तयार करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
या आंदोलनात मोठ्या संखेने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी परिस्थिति नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनदारम्यान काही ठिकाणी धक्काबुक्की, गोंधळ झाला. त्यानंतर पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं.
या आंदोलनात रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे हे देखील सहभागी झाले. पोलिसांच्या कारवाईदरम्यान शिवसेनेचे जितेंद्र आव्हाड तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सुप्रिया सुळेंसह काही महिला नेत्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं. आंदोलकंणे सरकारविरोधात अनेक घोषणा दिल्या “मोदी जब दरता हे, पोलिस को आगे करता हे”, “सरकार हमसे दरती हे”, अशी काहीशी घोषणाबाजी आंदोलनात सुरू होती. आंदोलनामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली.
महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. सरकारने तातडीने दर कमी करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी आणि बॅनरबाजी पाहायला मिळाली.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #ncp