मुंबईला पाणीपुरवठा करणारा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला आहे. 40 दिवस पुरेल इतकंच पाणीसाठा शहरात शिल्लक आहे.
ऐन उन्हाळ्याच्या उत्तरार्धात मुंबईकरांच्या डोक्यावर पाण्याचे मोठे संकट भिरभिरत आहे. मुंबई शहराची तहान भागवण्यात महत्त्वाचा वाटा असलेला आणि राज्य सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरण तलाव पूर्णपणे आटला आहे. या तलावातील उपयुक्त पाणीसाठा आता शून्य टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मुंबईला होणारा पाणीपुरवठा प्रशासनाला पूर्णपणे बंद करावा लागला आहे. 2025 मध्ये 1 जूनपर्यंत या तलावात 7 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी शिल्लक होते. पण यावर्षी उग्र उन्हामुळे परिस्थिति अत्यंत बिकट झाली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व 7 तलावांची टक्केवारी पाहिल्यास, त्यामध्ये केवळ 15.57 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच सातही तलावांमध्ये मिळून 2 लाख 25 हजार दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. वाढते उन्ह आणि पाण्याचे वेगाने आटणे लक्षात घेता, हा साठा मुंबई शहराला जेमतेम 40 ते 45 दिवसच पुरू शकतो. त्यामुळे येत्या महिनाभरात पावसाने जोरदार हजेरी लावली नाही, तर मुंबईवर तीक्ष्ण पाणीटंचाईचे आवास निर्माण होणार आहे.
अप्पर वैतरण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईची तहान भागावण्याची जबाबदारी आता उरलेल्या सहा तलावांवर आलेली आहे. त्यातही तानसा तलावाची पातळीही अवघ्या 10 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे तांसातूनही पानी उपसा कधीही बंद करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तुळशी विहार आणि तलाव आकाराने खूप लाहान आहेत. त्यातून दररोज जेमतेम 15 ते 18 दशलक्ष पाण्याचा पुरवठा होतो, जो मुंबईच्या एकूण गरजेच्या तुलनेत अत्यंत तुच्छ आहे.
आशा अत्यंत कठीण परिस्थितीत आता मुंबईकरांची मुख्य मदार राज्य सरकारच्या मालकीच्या भातसा तलावावर आणि पालिकेच्या मोडक सागर व मध्य वैतरणा तलावांवर अवलंबून आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा भातसा तलावाचा आहे. भातसा तलावामध्ये सध्या 1 लाख 7 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. त्यामधून दररोज सुमारे 1 हजार 700 दशलक्ष लिटर पाणी मुंबईसाठी सोडले जात आहे.
पण जर पावसाचे येणे लांबले, तर फक्त भातसा आणि मोदक सागराच्या जीवावर मुंबईमध्ये पाणीपुरवठा होणे, हे पालिकेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. मुंबईतील पाणी कपातीचे संकट टाळण्यासाठी आता केवळ पाऊसच्या आगमनाची वाट पाहावी लागणार आहे.
#topnewsmarathi #topnews #mumbainews #watershortage #bmc