अभिनेत्री रवीना टंडन हिच्या आईच्या घरी मोठी चोरी झाली. घरातील तिजोरी फोडून चोरी करण्यात आली, तिजोरी मधून हिऱ्याचे महागडे दागिने, महागडी घडयाळ चोरीला गेली. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल केला.
नुकतीच एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. बॉलीवुडची ‘मस्त मस्त गर्ल’ अभिनेत्री रवीना टंडन हिच्या आईच्या घरी तब्बल 25 लाखचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. या प्रसंगात एक विश्वासू महिलेलाच अटक केली आहे. अभिनेत्री रवीना टंडन यांच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन करून त्यांच्या आईचे जवळपास 25 लाख रुपये किमतीचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरल्याप्रकरणी जुहू पोलिसानी 47 वर्षीय राशी छाब्रिया हिल अटक केली आहे. दागिने चोरीला गेल्याचे कळताच पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. सुरुवातीला कुटुंबीयांनी चौकशी केली असता या महिलेने चोरी केल्याचा आरोप फेटाळून लावला.
माहिती नुसार, आरूपी महिला 2020 पासून टंडन कुटुंबियांच्या संपर्कात होती आणि रवीन टंडन यांच्या आईची देखबाल करण्यासाठी घरात सतत ये-जा करत होती. याच गोष्टीचा या महिलेने गैरफायदा घेतला. घरातील तिजोरी फोडून सोन्या-हिऱ्याचे दागिने आणि दोन महागडी घडयाळ चोरी केल्याचा तिच्यावर आरोप आहे. कुटुंबीयांना तिजोरी फोडल्याने चोरीचा संशय आला.
त्यानंतर तपासले असता दागिने हरवल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी चौकशी केली असता आरोपीने सुरुवातीला आरोप फेटाळले, मात्र, पोलिस तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली. चोरीतील काही घड्याळे जप्त करण्यात आली असून उरलेलया दगिन्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांकधून या प्रकरणात तपास केला जात आहे. महिला गेल्या काही वर्षांपासून संपर्कात होती, त्यामुळे तिच्यावर कुटुंबीयांना अजिबातच संशय आला नाही. मात्र, ज्यावेळी तिजोरी कोणीतरी फोडून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. जुहू पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
#topnewsmarathi #breakingnews #bollywood #topnews