पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी अखेर राष्ट्रवादी कॉँग्रेसने (अजित पवार गट) विक्रम काकडे यांची उमेदवारी निश्चित केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यातील येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असताना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पुण्यातील ‘जिजाई’ या निवासस्थानी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. रविवारी रात्री मॅरथॉन बैठकीत विक्रम काकडे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र आज सकाळी ऐनवेळी त्यांना एबी फॉर्म (AB Form) न मिळाल्याने सस्पेनसे वाढला होता. आता विक्रम काकडे स्वतः आणि अनेक ज्येष्ठ नेते ‘जिजाई’ बंगल्यावर पोहोचले असून महत्त्वाची बैठीक सुरू आहे.
उमेदवारीचा गोंधळ सोडवण्यासाठी सध्या सुरू असणाऱ्या या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित आहेत. राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार संजय काकडे हे देखील तातडीने ‘जिजाई’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आमदार अनिल पाटील, आमदार शंकर मांडेकर, आमदार चेतन तुपे, विलास लांडे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहे. ही उमेदवारी विक्रम काकडे यांनाच द्यायची की ऐनवेळी दूसरा कोणता राजकीय निर्णय घ्यायचा, यावर सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या जागेसाठी बरेच राष्ट्रवादी नेते इच्छुक होते. ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे (NCP) राहावी यासाठी स्थानिक नेते आग्रही होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रम काकडे नावाला ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर रविवारी रात्री जवळपास साडे चार तास चाललेल्या बैठकीत त्यांच्या नावावर मंजूरी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आज सकाळ पर्यंत ही ‘एबी फॉर्म’ न पोहोचल्याची माहिती मिळत आहे.
आज दुपारी 3 वाजे पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ असल्यामुळे ‘जिजाई’ बंगल्यावरील या बैठकीला महत्त्व मिळालं आहे. विक्रम काकडेंसह आता सुनील टिंगरे देखील उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची माहिती समोर येत आहे. आता ‘एबी फॉर्म’ विक्रम काकडेंना स्वाधीन करण्यात येतो की ऐनवेळी कोणता दूसरा निर्णय राष्ट्रवादीकडून पाहायला मिळतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे टिपून आहेत.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #punenews #ncp #vidhanparishanelection #ajitpawar