विषारी दारू प्रकरणामुळे राज्यात खळबळ: युवक कॉँग्रेसचं पुण्यात आंदोलन. - टॉप न्यूज मराठी

विषारी दारू प्रकारणाने पुण्यात धुमाकूळ घातला आहे. मृतांचा आकडा आता १८ पोहोचला आहे, तर कॉँग्रेस युवासह गुलाबो गँगही रस्त्यावर उतरली आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे विषारी दारू मुळे जवळपास १८ लोकांनी आपल्या जीव गमावला आहे. या मुळे राज्यभरात संतापाचे वातावरण पसरले आहे. युवक कॉँग्रेस आणि गुलाबो गँगने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. बेकायदेशीर दारूची विक्री बंद करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. पोलिस आयुक्तांनी १३ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. 

विषारी दारू प्यायल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील १७-१८ लोकांचा जीव गेला आहे. पुण्यातील हडपसर, कळेपडळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या घटनेने अख्खं राज्य हादरलं आहे. पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालया बाहेर युवक कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे. इतक्या लोकांचा जीव गेल्यामुळे कॉँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. कार्यकर्त्यांचा संताप दिसताच बाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुरू असतानाच, त्यांनाही घोळका घालत जाब विचारण्यात आला. 

विषारी दारूकांडमधील आरोपी गुन्हेगार योगेश वणखेडेला परत का सोडलं? वणखेडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याला कोणी सोडलं, असं प्रश्न विचारण्यात आला. तसेच पोलिस आयुक्तांनी १३ अधिकाऱ्यांना निलंबित केलं. पण महत्वाचा आरोपी बाहेर असताना त्यांच्यावर अजून कारवाई का केली नाही, त्यांची नावं अजून का बाहेर आलेली नाहीत, असा सवाल आक्रमक कार्यकर्त्यांनी केला आहे. 

गुलाबो गँगही दारू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत रस्त्यावर उतरली आहे. पुण्यातील पर्वती पायथा परिसरात संगीता तिवारी यांच्या गुलबो गँगकडून आंदोलन करण्यात आलं. विषारी दारूमुळे पुण्यात झालेल्या १५ पेक्षा जास्त नागरिकांच्या मृत्यूनंतर बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांविरोधात गुलबो गँगने “हल्लाबोल आंदोलन” केलं. या आंदोलनात हातात फुगे आणि काठ्या घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.  

शिवसेनेने पुण्यात दारूचे ५ अड्डे उध्वस्त केले. पुण्यात विषारी दारु ने १८ जणांचा मृत्यू झाल्याने आज पुण्यात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी जवळपास ५ दारूचे अड्डे उध्वस्त केले आहेत. ५ अड्डे फोडले, गावठी दारू सापडली बरीच दुकान फोडली, अशी माहिती समोर येत आहे. पुणे पोलिस नक्की काय करतात? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

#topnewsmarathi #toxicalcohol #topnews #breakingnews #punecrime