मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार: सरकार कडे जरांगेंच्या “या” मागण्या. - टॉप न्यूज मराठी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा अंतरवालीमध्ये आमरण उपोषण करणार. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवालीत आमरण उपोषणाला बसले आहेत. भरउन्हात बाज टाकून जरांगेंच हे उपोषण सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची काल भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड मनोज जरांगेंच्या भेटीला आले असून जरांगे यांची विनवणी करण्यात त्यांना अपयश आलं. काल [२९ मे] दीड तास राधाकृष्ण विखे पाटलांने जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जरांगेंनी हैदराबाद गॅझेटसह कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून विखेंवर प्रश्नांचा धूमधडाका केला. दरम्यान चर्चेत कोणताही तोडगा निघाला नसल्याने जरांगे आजपासून उपोषणाला बसले. मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारला आता वेळ देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आज सकाळी १० वाजल्यापासून जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. 

जरांगेंच्या सरकारकडे या मागण्या. 

  1. मारठवाड्यातील सर्व मराठ्यांना २९ मे च्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या. 
  2. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि औंध, मिरज संस्थांचा GR काढा. 
  3. आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि नोकरीचा GR काढा. 
  4. सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा. 
  5. दिलेल्या कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी द्या. 
  6. कुणबी- मराठा स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा. 
  7. महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप करावे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं राजश्री शाहू महाराज यांच्या चरणी उभे राहून आंदोलन करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलन अनुमोदन व्यक्त करताना, सातारासह कोल्हापूर गॅझेटचाही विचार करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे. 

मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पटलांमधील चर्चा-

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनदरम्यान मनोज जरांगे पाटील यांची अंतरवलीमध्ये भेट घेतली. विखे पाटील आणि जरांगे यांच्यामध्ये सखल चर्चा झाली. चर्चेदरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंना “उन्हात नाही तर सावली मध्ये बसा” अशी विनंती केली, त्यावर जरांगे यांनी “मी उन्हात बसलो तर सरकार ला चटके बसतील” अशी प्रतिक्रिया दिली. जरांगेंनी विखे पटलांसामोर आपल्या मागण्या ठेवल्या. 

विखेंसमोर जरांगे यांच्या या मागण्या: 

ओबीसी आणि मराठा स्वतंत्र मंत्रालय कर. 

५८ लाख नोंदींवर प्रमाणपत्र द्या. 

सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याची मागणी 

कुणबी प्रमाणपत्र दिलेल्यांना व्हॅलिडिटी द्या. 

अशा काही मागण्या जरांगेंनी समोर मांडल्या. राधाकृष्ण विखे पाटील सरकार च्या वतीने ड्राफ्ट घेऊन आले. त्या ड्राफ्ट वर “अभ्यासकांचा सल्ला घेऊन संध्याकाळी कळवतो” असे जरांगे म्हणले. आज संध्याकाळी ५ वाजे पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या ठिकानातून अभ्यासक येतील, त्यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवू. ड्राफ्टमधील अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्या व १५ दिवसात व्हॅलिडिटीचा आढावा घेणे हा निर्णय चांगला असे जरांगे म्हणले.     

#topnewsmarathi #breakingnews #marathareservation #topnews #manojjarangepatil