‘किसी मोड पर फिर मुलाकात होगी..’ - टॉप न्यूज मराठी

मुसाफीर हे हम भी, मुसफिर हो तुम भी किसी मोड पर फिर मुलाकात होगी म्हणणारे प्रसिद्ध पद्मश्री सन्मानित शायर बशीर बद्र ह्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 

अरबी आणि फारसी भाषेच्या कठीण चौकटीतून उर्दू शायरी बाहेर काढून ती लोकांपर्यंत पोहोचवणारे महान शायर बशीर बद्र यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. बद्र यांना डिमेंशिया [स्मृतिभ्रंश] झाला होता. बशीर बद्र यांच्या निधनाने हिंदी आणि उर्दू साहित्य जगात शांतता पसरली आहे. जगभरातील शेकडो चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. 

बशीर बद्र यांचा जीवन प्रवास 

बशीर बद्र यांचे मूळ नाव सय्यद मोहम्मद बद्र असे होते. १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेश मधील फैजाबाद [आज आयोध्या] येथे त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या ७ व्या वर्षापासूनच शेरोशायरी लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. लाहापान पासूनच त्यांना शारी गझल ची आवड असल्याने त्याने साहित्य विश्वात खूप लवकर पाऊल ठेवलं. बद्र यांने अलिगढ मुस्लिम विध्यापिठातून बीए, एमए आणि त्यानंतर उर्दू साहित्यात पीएच.डी. पदवी मिळवली. शैक्षणिक काळ पूर्ण झाल्यावर त्यांनी याच विध्यापिठात प्राध्यापक म्हणून सेवा केली. पुढे ते मेरठ कॉलेजमध्ये उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून दाखल झाले आणि १ वर्ष तिथे कार्यरत होते. 

मेरठ दंगलमध्ये सर्व काही खाक झालं. विशाल भारद्वाज ने पुढे केला मदतीचा हाथ.

१९८७ मध्ये मेरठमध्ये जातीय दंगल सुरू होती, त्या दंगलीने बशीर बद्र यांचे आयुष्य अत्यंत वेदनेने भरले. दंगळखोरांने त्यांचे मेरठमधील घर लुटून पेटवून दिले. या आगीत त्यांच्या शैक्षणिक पदव्या आणि अनेक हस्तलिखित ऐतिहासिक, अप्रकाशित गझला व कविता जळून खाक झाली. या धक्क्याने बद्र साहेब आतून पूर्णपणे ढासळून गेले. 

बद्र साहेब यांच्या या कठीण काळात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज जे त्या वेळी 'विद्यार्थी होते, ते बद्र यांच्या मदतीला धावून आले. भारद्वाज अनेकदा बशीर साहेबांच्या घरी जात असत. बद्र साहेबांच्या तोंडून ऐकलेल्या गझला आणि कविता त्यांना तोंडपाठ होत्या. त्यांनी आपल्या स्मरणशक्तीच्या जोराने साहेबांच्या जवळपास 90 टक्के गझला पुनः लिहून काढल्या आणि त्यांना पुनः एकदा उभारी दिली. 

 बशीर साहेबांचे विवाहिक जीवन. 

मेरथमधल्या भीषण अपघातानंतर बशीर बद्र काही काळ बरेलीत जाऊन राहिले. नंतर ते आपल्या मित्रांच्या सल्ल्याने भोपाळला स्थायिक झाले. तेथे त्यांची भेट डॉ. राहत यांच्याशी झाली, ज्यांच्यासोबत त्यांने पुढे विवाह केला.  

देशभरात पसरलेली नाराजगी. 

बशीर बद्र यांचा निधनाने फक्त सर्वसामान्यांच्याच नाही तर सुप्रसिद्ध गीतकार आणि कवि जावेद अख्तर यांना ही धक्का पोहोचवला. “आज आपली उर्दू भाषा आणखी गरीब झाली आहे. एक अत्यंत सुमधुर शायर बशीर बद्र नेहमीसाठी आपल्या मैफिलितून निघून गेले आहेत. हे शायर आणि त्यांची शायरी आपल्या आठवणींमध्ये नेहमी जीवंत राहील.” असं अख्तर म्हणाले. 

पद्मश्री आणि अनेक सर्वोच्च सन्मान.

बशीर बद्र यांना साहित्यातील योगडणासाठी १९९९ मध्ये केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याच वर्षी त्यांच्या ‘आस’ या प्रसिद्ध काव्यासंग्रहसाठी त्यांना ‘साहित्य अकॅडेमी पुरस्कार’ मिळाला. लोकांना प्रेम, माणुसकी आणि आपुलकीचे बोल दिले, आज ते स्वतःच लोकांमध्ये आठवण बनून राहतील. 

#topnewsmarathi #topnews #entertainment #breakingnews