पुण्यामध्ये विषारी दारुणे घेतला १५ जणांचा जीव. योगेश वणखेडे असे आरोपीचे नाव. - टॉप न्यूज मराठी

विषारी दारूमुळे पुण्यात तब्बल १५ जणांचा ४८ तासांत मृत्यू झाला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील ४८ तासांत १५ जणांचा मृत्यू जल. एकाच दिवशी आठ जणांचा मृत्यू जल होता. अनेक लोकांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता भासल्या जाते. अवघ्या ४८ तासांत १५ जणांचा जीव गामावल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 

माहिती नुसार १५ जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला आहे असे कारण समोर येते. दारू मध्ये मेथेनॉलची भेसळ करण्यात आली होती. मयत लोक हडपसर, दापोडी, फुगेवाडी आणि काळेपदळ भागातील आहेत. सुरुवातीला चक्कर येणे, उलट्या होणे आणि त्यानंतर तोंडाला फेस येणे, आशा प्रकारचा त्रास जाणवू लागला. अजूनही बरेच लोक विविध रुग्णालयात उपचार घेत असून काहींची प्रकृती नाजुक असल्याची माहिती समोर येते, आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. 

पोलिसांनी पुण्यातून योगेश वणखेडे नावाच्या गुणहगरला अटक केली आहे. वणखेडे हाच १५ जणांच्या मृत्यूला जबाबदार आहे अशी माहिती समोर येत आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील हा राहवासी होता. पुण्यातील उरली कांचन आणि पिंपरी चिंचवडमधील फुगेवयादी येथे बनावट दारू वणखेडे बनवत होता. हीच दारू तो पुण्यातील हडपसर, काळेपड आणि पिंपरी चिंचवड शरातील भागात विकायचा. या प्रकरणात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिकांकधून “अवैध हटभट्टी दारू खुलेआम विकली जात होती.  

विषारी दारू प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांने आता दखल घेतली आहे. फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात माझं पुणे पोलिस आयुक्तांशी बोलणं झाले आहे. विषारी दारू कुठे तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे. याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोकांचा यात समावेश असू शकतो, ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ही घटना खूप गंभीर आहे. जय ठिकाणी हे सगळं तयार झालं त्याच्या पंथीमगहे कोण कोण आहेत हे पोलिस शोधून काढत आहेत. प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यानंचयावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्रींसह बरेच राजकीय नेत्यांने ह्या प्रकरणात दाखल घेत असून प्रशाणाला जाब विचारलं आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार गतातले रोहित पवार हयणणे पिढीत कुटुंबांसोबत संवाद साधला. या संपूर्ण विषारी दारू प्रकरणामंगहे असलेल्या मुख्य सूत्रधारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या तत्काळ सदोष मानुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.