विधानपरिषद निवडणूक; महायुतीचा पहिला उमेदवार ठरला ! अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपकडून 'या' नेत्याला संधी - टॉप न्यूज मराठी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, भाजपने गुरुवारी अमरावती मतदारसंघातून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. 

राज्याचे महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पोटे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.