“बॉलीवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी म्हणून संबोधतात”, वैभव मांगले यांचे फेसबुक पोस्टद्वारे परखड भाष्य - टॉप न्यूज मराठी

 

मराठी अभिनेते वैभव मांगले जितके कसलेले कलाकार आहेत, तितकेच ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. सामाजिक विषय किंवा मनोरंजन विश्वातील घडामोडींवर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मते अतिशय परखडपणे मांडतात. सध्या वैभव मांगलेंची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत मराठी कलाकारांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल थेट आणि स्पष्ट भाष्य केलं आहे. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी समजलं जातं. तिथे मराठी कलाकारांना कुणीही हिरो हिरोईन म्हणून घेत नाही, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वैभव मांगले म्हणाले की, " हे हे “मराठी “कलाकार हिंदीत चमकणार , चमकले, चमकतील .

हे फालतू कोड कौतुक पहिलं बंद केलं पाहिजे… तिथे चमकलं म्हणजे आपण भारी कलाकार का ????

बिनडोक पणा आहे … आम्ही इथे काम करतो .. इथे आमच्या वर प्रेम करतात लोक आणि हिंदीत नाव कमावलं म्हणून कुणी मराठी रसिक हिंग लावून विचारतं नाही त्याला…. 

बर तिथे ही कुणी हिरो , हिरोईन म्हणून घेत नाही … मराठी पार्श्वभूमी असलेल्या भूमिकाच देतात… माधुरी आणि नाना सोडले तर काही कुणी किंमत देत नाहीत तिथे.. घाटी म्हणून संबोधतात.. एक आकस आहे त्याना आपल्या कलाकारांबद्दल .. कधीही किंमत दिली नाही मराठी कलाकारांना ..

म्हणजे आमचं कमी अस्सल आणि ते अव्वल. 

फलतूगीरी 

आमचे प्रशांत दामले , उमेश कामत , प्रिया बापट , भरत जाधव , मुक्ता बर्वे , निर्मिती सावंत , मकरंद अनासपुरे , प्रसाद ओक , स्पृहा इ इ खूप महत्वाचे आणि खूप खूप मोठे कलाकार आहेत … धन्यवाद.

( आता काही महाभाग .. आपल्या कुणी काम दिलं नाही वाटतं म्हणून हे सुचतयं असं बोलतील.. पण त्याना सांगून ठेवतो मला कधी त्या इंडस्ट्रीने भुरळ घातली नाही..किंवा तिथे काही केलं तरच आपण भारी असं कधी ही वाटलं नाही)

वैभव मांगले यांनी रंगभूमीवर बालनाटकांपासून ते गंभीर कौटुंबिक नाटकांपर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत: