नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांवर आता चित्रपट येतोय. यात अभिनेत्री दीपाली सय्यद थेट रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. समाजात कधी कोण कुठल्या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकेल सांगता येत नाही, याचाच धक्कादायक प्रत्यय नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे आला होता. आता याच बहुचर्चित आणि वादग्रस्त प्रकरणावर एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या आगामी चित्रपटात दीपाली सय्यद थेट राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याची दाट शक्यता आहे.