मनोरंजन विश्वातून एक अत्यंत अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनेक लोकप्रिय टीव्ही शो, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा यांचे आज (२६ मे २०२६) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपट आणि नाट्यसृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
रमाकांत दयामा यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक दर्जेदार हिंदी-मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र, दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या अत्यंत गाजलेल्या 'स्कॅम १९९२' या वेब सीरिजमध्ये त्यांनी साकारलेली मुख्य पात्र 'हर्षद मेहता' यांच्या वडिलांची (शांतीलाल मेहता) भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेतील त्यांच्या सहज आणि प्रभावी अभिनयामुळे त्यांना प्रेक्षक व समीक्षकांकडून विशेष पसंती आणि प्रसिद्धी मिळाली होती.