'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू - टॉप न्यूज मराठी

महाबळेश्वरजवळील आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ जवळपास एक हजार फूट दरीत कोसळून आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये ‘अप्पी आमची कलेक्टर’ या  मालिकेत काम केलेला २५ वर्षीय मराठी अभिनेता महेश पवारचा दुर्देवी मृत्यू झाला. 

महेश पवार हा साताऱ्यातील आसगाव येथे कुटुंबासहित राहत होता. शुक्रवारी महेश आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत कोकणातील हर्णे बंदर येथे गेला होता. शनिवारी रात्री कोकणातून साताऱ्यात परतत असतानात रायगडमधील आंबेनळी घाटात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. महेश अभिनय क्षेत्रात त्याचं स्वत:चं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. महेशसोबत त्याच्यासोबत फिरायला गेलेल्या आठही मित्रांचा मृत्यू झाला आहे. आदित्य साळुंखे (वय 21), महेश पवार (25), रितेश लोखंडे (21), सुहास लोखंडे (19), अंश चव्हाण (19), निखिल शिंगटे (21), संदीप काटकर (35), उत्कर्ष शिंगटे (21) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढले. या अपघातात गाडीतील कोणीही वाचले नाही.