मागील आठवड्यात तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली. देशात सतत वाढणाऱ्या या पेट्रोल डिझेलच्या किमतीमुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत आला असून
केंद्र सरकारने दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन किमती वाढवण्याचा निर्णय घ्यावा
व पेट्रोल डिझेलवर असणारे कर कमी करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी केली आहे.