अकोला जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली असून पोलीस दलाची मान शरमेन खाली घालायला लावणारी घटना घडली
आहे एका पोलिस कर्मचाऱ्यानं पोलीस भरतीचा प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे..
या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली
आहे सचिन गायकवाड असं अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. अकोला पोलीस दलात चालक म्हणून कार्यरत असलेल्या सचिन गायकवाड यानं पीडित तरुणीला लग्नाचं अमिष दाखवलं..
आणि तिच्या विरोधात वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या धक्कादायक घटनेमुळे अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे