हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात आराडी फाटा येथील शिवपार्वती पेट्रोल पंपावर डिझेल खरेदीसाठी आलेल्या रांगेत शेतकऱ्यांमध्येच हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे
या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय
शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेल्या डिझेल खरेदी करण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळते
याच गर्दीत रांगेतील कारणावरून दोन गटात वाद झाला आणि या वादाच रूपांतर हाणामारीत झालं.
या घटनेत काही शेतकरी गंभीर जखमी झाल्याचे माहिती समोर आली आहे