अकोल्यात ऑइल गोदामाला आग; अग्निशामन दलाच्या जवानाला मोठी दुखापत - टॉप न्यूज मराठी

अकोला मुर्तीजापुर रस्त्यावरील शिवनी येथे असलेले एका ऑइल गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

 अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवला यामुळे मोठे दुर्घटना टळली आहे 

मात्र ही आग विझवताना अग्निशामन विभागातील एका जवानाला गंभीर दुखापत झाली आहे. 

विजय सोनोने असं जखमी झालेल्या जवानाचं नाव असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असताना 

अचानक आगीचा मोठा लोंढा उडाला जात ते जखमी झालेत. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचा कारण अद्याप अस्पष्ट आहे