कान्स २०२६ : ऐश्वर्या राय बच्चनचा रेड कार्पेटवर पुन्हा एकदा जलवा - टॉप न्यूज मराठी

जागतिक सौंदर्यवती आणि बॉलिवूडची 'क्वीन' ऐश्वर्या राय बच्चन हिने फ्रान्समधील ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes 2026) पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची जादू दाखवली आहे. सलग २३ व्या वर्षी लॉरेल पॅरिसची (L'Oréal Paris) ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून तिने रेड कार्पेटवर हजेरी लावली.  

'ल्युमिणारा' गाऊनमध्ये ऐश्वर्याचा फ्युचरिस्टिक लूक

ऐश्वर्याने 'द बर्थडे पार्टी' या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी रेड कार्पेटवर पाऊल ठेवले. यावेळी तिने भारतीय डिझायनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केलेला मेटॅलिक सफायर-ब्लू (गडद निळा) रंगाचा 'ल्युमिणारा' मरमेड गाऊन परिधान केला होता. या गाऊनवर समुद्राच्या लाटांप्रमाणे नक्षीकाम करण्यात आले होते. तिच्या खांद्यावरील पंखांसारखी डिझाईन आणि स्लीव्हजच्या वेगळ्या स्टाईलने या लूकला एक मॉडर्न आणि फ्युचरिस्टिक टच दिला होता.