महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत एकूण ८६७ मतदारांचा समावेश आहे. त्यामध्ये ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली.
प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. २९ मे २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये पुढील मतदान केंद्रांचा समावेश आहे :
१) श्री शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी स्कूल, जुनी दगडी (हेरिटेज) इमारत, शिवाजीनगर, पुणे
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पब्लिक स्कूल, प्राथमिक शाळा, खराळवाडी, पिंपरी चिंचवड
३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंचर
४) महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर
५) विद्याधाम प्रशाला, शिरुर
६) नवीन प्रशासकीय इमारत (तहसील कार्यालय), दौंड
७) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, मुलींची शाळा, बारामती
८) एमईएस वाघिरे हायस्कूल, सासवड
९) श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कन्याशाळा, भोर
१०) न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा, वडगाव मावळ
११) रयत शिक्षण संस्थेचे साधना प्राथमिक विद्यालय, माळवाडी, हडपसर या ठिकाणांचा समावेश आहे.
मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्र सदस्य मतदार म्हणून समावेश करण्यात आला आहे.
प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी ,निवासी उपजिल्हा अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी , जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे निवडणूक विभागाच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली असून आवश्यक असल्यास मतदार यादीवर मुदतीत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. यादीवर हरकत ७ नंबर,यादीत नावं समाविष्ट करणे १७ नंबर, नावात बदल करणे ८ नंबर फॉर्म भरून देता येईल.