मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक - टॉप न्यूज मराठी

वारकरी संप्रदायातील  घुसखोरीच्या विधानावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने  चर्चेत असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि संघटक सचिव विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर झालेल्या शाईफेकीची घटना ताजी असतानाच आता पोलिसांनी केलेल्या या थेट कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, लवांडे यांच्यावर ही अटकेची कारवाई नेमकी कोणत्या गुन्ह्याखाली आणि का करण्यात आली, याचे कारण अद्याप पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी "वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली आहे" असा गंभीर आरोप केला होता. एवढ्यावरच न थांबता त्यांनी  एक यादीच जाहीर केली होती. त्यांच्या या विधानामुळे वारकरी संप्रदायातून आणि इतर स्तरांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या वादातूनच काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर जाहीरपणे शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता 

शाईफेकीच्या या प्रकारानंतर शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवांडे यांच्या समर्थनार्थ आक्रमक झाले होते. या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला होता.