कोकणकरांना  दिलासा ! ‎ ‎परशुराम घाटातील दुसरी लेन अखेर सुरु ! ‎ - टॉप न्यूज मराठी

‎कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि गूड न्यूज! जर तुम्ही मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा येत्या पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी एक मोठा दिलासा मिळाला आहे. महामार्गावरील सर्वात आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या 'परशुराम घाटातील' रस्ता आता अधिक सुरक्षित आणि मोकळा झाला आहे.

‎

‎गेल्या अनेक वर्षांपासून परशुराम घाटात डोंगरकटाई आणि रुंदीकरणाचे काम सुरू होते. पण आता आनंदाची बातमी अशी की, घाटातील दुसरी लेन म्हणजेच दोन्ही बाजूंची वाहतूक आता पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे! मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे सध्या कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे, पण या दुसऱ्या लेनमुळे घाटातील वाहतूक कोंडी आता इतिहास जमा झाली आहे.

‎​

‎​ पावसाळ्यात परशुराम घाटात दरडी कोसळणे किंवा रस्ता बंद होणे अशा अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागायचे. पण आता प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने घाटाचे ८० ते ८५ टक्के काम पूर्ण केले आहे.​डोंगराचा भाग मजबूत करण्यासाठी इथे रॉक बोल्टिंग  करण्यात आले आहे. तसेच माती आणि दगड रस्त्यावर येऊ नयेत म्हणून मजबूत रिटेनिंग वॉल  आणि गॅबियन वॉल उभारण्यात आल्या आहेत. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.

‎

‎​पावसाळा तोंडावर असल्याने उरलेले १५ ते २० टक्के कामही प्रशासन युद्धपातळीवर पूर्ण करत आहे. थोडक्यात सांगायचे तर, यंदा कोकण आणि गोव्याची वारी एकदम सुस्साट आणि सुरक्षित असणार आहे!

‎